महत्वाच्या बातम्या

 चाईल्ड इंडिया फाउंडेशन यांच्याकडून ग्राम बाल संरक्षण समित्यांना भेट


- गडचिरोली तालुक्यातील कनेरी, काटली, वाकडी, बोदली व खरपुंडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आम्ही आमच्या आरोग्यासाठी व लेहर फाउंडेशन यांच्या विद्यमाने गडचिरोली तालुक्यातील २५ गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आले आहे. व त्या समित्यांसोबत दर महिन्याला बैठक घेतल्या जात आहे. गावातील बालकांच्या विविध समस्यावर चर्चा करून समित्यांना सक्षम करण्याकरिता कार्यशाळा घेतल्या जात आहे. ग्राम बाल संरक्षण समित्यांची भूमिका व जबाबदारी काय? हे समजावून सांगण्यात आले. ३० नोव्हेंबर २०२२ ला गडचिरोली तालुक्यातील कनेरी, काटली, वाकडी, बोदली व खरपुंडी या गावात जाऊन प्रत्यक्षात गाव स्तरीय ग्राम बाल संरक्षण समितीला भेट देऊन समिती सोबत बालकांसंदर्भात विविध समस्यावर चर्चा करण्यात आले व त्या समस्या समितीच्या माध्यमातून बालकांच्या समस्या कशा सोडविल्या जाऊ शकतील याविषयी उपाययोजना काय? यावर सविस्तर चर्चा करण्यात आले. यामध्ये चाईल्ड इंडिया फाउंडेशन कडून अनिल बडे, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक राजकुमार गुप्ता यांनी मार्गदर्शन केले व चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोली येथील प्रकल्प समन्वयक छत्रपाल भोयर व टीम मेंबर अविनाश राउत, वैशाली दुर्गे, भारती जवादे, मयुरी रकतसिंगे हे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos