हैद्राबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका, चार आरोपींना केली अटक


- ७६ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त, गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरची परिसरातून मोठ्या प्रमाणात हैद्राबाद येथे जनावरांची वाहतूक करण्यात येणार असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहतीच्या आधारे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस हवालदार भाउराव बोरकर, नरेश सहारे, सत्येम लोहंबरे, नाईक पोलिस शिपाई मंगेश राऊत, चालक माणिक निसार, आरमोरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी व इतर कर्मचारी यांनी पोलिस स्टेशन आरमोरी हद्दीतील वैरागड टी पाईंट येथे सापळा रचून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेल तीन कंटेनर (क्र. टीएस १२ युबी ७६२०, टीएस १२ युबी ६७२१, टीएस ०७ युएफ ९१८२) गुरूवार, ९ जानेवारी २०२० रोजी ताब्यात घेतले. या कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये ९१ जनावेर आढळून आली. यामध्ये ४ जनावरे मृतावस्थेत आढळून आली. गडचिरोली पोलिसांनी जनावरे व कंटेनर असा एकूण ७६ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी आरोपी शाहरुख गफ्फार खान रा. आर्णी, मोहम्मद शकील समशेर रा. हैद्राबाद, अल्ताफ अकबर शेख रा. गडचांदूर, इब्राहिम खान हमीद खान रा. हैद्राबाद यांना तात्यात घेवून त्यांच्याविरुद्ध आरमोरी पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमांक १०/२०२० प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम कलम ११ (१) ड, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षा अधिनियम कलम ५ (१) (अ), ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गडचिरोली पोलस दल घटनेचा पुढील तपास करीत आहे. ही कामगिरी करणाऱ्या  पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतूक केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-09


Related Photos