'निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषींना एकाच वेळी फासावर लटकावण्याची तिहार तुरुंगाची तयारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / नवी दिल्ली :
'निर्भया' बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना एकाच वेळी फासावर लटकावण्याची तयारी तिहार तुरुंग प्रशासनानं सुरू केली आहे. दुसरीकडे, दोषींना नेमकी कधी फाशी देण्यात येईल, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पतियाळा हाऊस कोर्टानं शुक्रवारी दोषींच्या डेथ वॉरंटवरील सुनावणी तहकूब केली आहे. तसंच एका दोषीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळं फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर पडू शकते.
निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना फासावर लटकावण्याची तयारी तुरुंग प्रशासनानं सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकाच वेळी चौघांना फाशी देण्यासाठी नव्या तंत्राचं परीक्षण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी फासावर लटकावले जाते, त्यात काही बदल करण्याचे काम सुरू आहे, असे समजते. चौघांचे वजन एकाच वेळी उचलण्याची क्षमता आहे की नाही हे तपासले जात आहे. चौघांना एकाच वेळी फाशी देणे आवश्यक आहे. अंमलबजावणीवेळी एखाद्याला अस्वस्थ वाटू लागले तर, तो आजारी होऊ शकतो आणि फाशी टळू शकते.  Print


News - World | Posted : 2019-12-13


Related Photos