जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, ४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेतील त्यांच्या कक्षात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कंकडालवार यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण गडचिरोली जिल्हयातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्हयातील आरोग्याच्या संदर्भातील समस्या, अडवणी, प्रलंबित प्रश्ने जाणून घेतली. तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व आरोग्य पथकाच्या जिर्ण झालेल्या इमारतींची माहिती व आवश्यक ठिकाणी करावयाचे बांधकाम याबाबत सुद्धा माहिती कंकडालवार यांनी यावेळी जाणून घेतल्या. जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रातील औषध पुरवठयाची काय स्थिती आहे, ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सोयी -सुविधा मिळतात की नाही, जनतेला आरोग्य सुविधा देताना काय अडचणी येतात काय याची सुद्धा माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या बैठकीत जाणून घेतली. ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, पाण्याची सुविधा, यंत्र सामुग्री यांचाही त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-04


Related Photos