अवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सापळा रचून आरोपी कार्तिक अरुणराव पराड, वय ३३ वर्ष रा. गडचिरोली यास मारोती सुझुकी कंपनीचे स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४० ए.आर. ७९०७ मधून अवैध दारूची वाहतूक करतांना देसाईगंज ते आरमोरी रोडवर मोठ्या शिताफीने पकडून दारूसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला . 
वाहनांची झडती घेतली असता रॉकेट संत्री कंपनीच्या दारूचे १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या २५ पेट्या आढळून आल्या व  वाहतुकी करीत वापरलेले स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन अंदाजे किंमत ५ लाख २५ हजार रुपये असा एकूण ७ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कार्तिक पराड यास ताब्यात घेऊन त्याच्या व पाहिजे आरोपी स्वप्नील वानखेडे रा. गडचिरोली यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी येथे अपराध क्रमांक २००/२०१८ कलम ६५(अ),८३,९८ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्या आला आहे. 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली चे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि भागवत कदम व त्यांच्या पथकाने केली आहे .गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा रामदास जयभाय हे करीत आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याकारणाने जर कोणी दारूचे उत्पादन, वाहतूक किंवा विक्री करीत असेल तर अशा इसमाची माहिती तात्काळ ०७१३२-२२३१७४ या क्रमांकावर द्यावी. अशा इसमांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-11


Related Photos