पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाला केंद्राकडून एक वर्षाची मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
 केंद्र आणि राज्य सरकारांतून मिळणारा वाटा व त्यासाठीचे स्रोत ठरवणाऱ्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाला १ वर्षासाठी ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. या वित्त आयोगाची मुदत खरे तर ऑक्टोबर २०१९ मध्येच संपत होती, पण त्याला याआधी १ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती ती ३० नोव्हेंबरला संपणार आहे. या आयोगाला २०२१-२२ ते २०२५ -२६ च्या आर्थिक वर्षांसाठी करनिर्धारणाबाबतच्या आपल्या शिफारशी केंद्राकडे सादर करायच्या आहेत.  Print


News - World | Posted : 2019-11-28


Related Photos