महत्वाच्या बातम्या

 चिखलवर्धा येथील माजी सैनिक सैय्यद अब्दुलशाह गाझी यांची रोहीची शिकार केल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता


- घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी अतुल उत्पात यांचे आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलन्की / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील माजी सैनिक सैय्यद अब्दुलशाह गाझी (वय ५८, रा. चिखलवर्धा ता. घाटंजी) यांनी रोहीची शिकार केल्या प्रकरणी, घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी अतुल उत्पात यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी सैय्यद अब्दुलशाह गाझी यांचेतर्फे यवतमाळचे प्रसिद्ध फौजदारी वकील ADV. एस. एम. अली यांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला.

चिखलवर्धा येथील माजी सैनिक सैय्यद अब्दुलशाह गाझी यांनी रोहीची शिकार केल्या प्रकरणी कृष्णा धनसिन्ग राठोड यांनी वनगुन्हा क्र. १०८/२०१५ दाखल करुन, नन्तर पारवा पोलीस ठाण्यात २०/०६/२०१५ रोजी अपराध क्रमान्क ६७/२०१५ भादवि कलम १८६, ५०६ अन्वये गुन्हा नोन्दविण्यात आला होता. 

खबर देणार हा चिखलवर्धा येथील ग्रामपन्चायत कार्यालयात बसुन होता. त्यावेळी सन्शयीत आरोपी सैय्यद गाझी हा म्हणाला की, मै तुम्हारा कबसे नाटक देख रहा हूँ. यहा आरोपी हजर है. पन्चनामा फाड दो और यहा से चले जाओ, नही तो एक एक का गेम बजा डालुन्गा. अशी धमकी दिली होती. सदर प्रकरणाचा तपास जमादार राजीव गिरडकर यांनी करुन दोषारोपपत्र घाटंजी न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. तसेच तपासा दरम्यान काहीएक मुद्देमाल जप्त करण्यात आला नाही.

त्यामुळे चिखलवर्धा येथील सन्शयीत आरोपी सैय्यद अब्दुलशाह गाझी यांची फौजदारी प्रक्रीया सहीन्ता कलम २५८ (१) अन्वये, भारतीय दन्ड सहीन्ता कलम १८६, ५०६ अन्तर्गत शिक्षापात्र गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे आदेश प्रथम वर्ग न्यायदन्डाधिकारी अतुल उत्पात यांनी दिले.

सन्शयीत आरोपी सैय्यद अब्दुलशाह गाझी यांची बाजू ADV. एस. एम. अली यांनी मान्डली.





  Print






Related Photos