महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२६ एप्रिल महत्वाच्या घटना

१९०३ : अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

१९३३ : नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.

१९६२ : रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

१९६४ : टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.

१९७० : जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.

१९७३ : अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

१९८६ : रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

१९८९ : बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

१९९५ : आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

२००५ : आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.

२६ एप्रिल जन्म

१४७९ : पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.

१९०० : रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)

१९०८ : भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)

१९४० : भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)

१९४८ : अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.

१९७० : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.

२६ एप्रिल मृत्यू

१९२० : थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १८८७)

१९७६ : साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०)

१९८७ : शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

१९९९ : लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos