आजचे दिनविशेष
२२ एप्रिल महत्वाच्या घटना
१०५६ : क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
१९४८ : अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१९७० : पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९७७ : टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९९७ : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
२००६ : प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.
२२ एप्रिल जन्म
१६९८ : नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.
१७२४ : जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)
१८१२ : भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
१८७० : रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
१९०४ : अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
१९१४ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)
१९१६ : अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९१६ : व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९९९)
१९२९ : चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)
१९२९ : भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.
१९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.
१९४५ : भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.
२२ एप्रिल मृत्यू
१९३३ : रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)
१९८० : जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)
१९९४ : विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.
१९९४ : अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९१३)
२००३ : पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)
२०१३ : व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
२०१३ : भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३३)
News - todayspecialdays