महत्वाच्या बातम्या

 अपूर्व बालपांडे (५४६) यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरातील अपूर्व अमृत बालपांडे यांनी भवन्स विद्या मंदिर, श्रीकृष्ण नगर नागपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे. 

रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर येथून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनी सन २०१८ मध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वानाडोंगरी नागपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. केले आहे. त्यांनी दिल्ली व पुणे येथून नागरी सेवा परीक्षेची तयारी केलेली आहे. पाचव्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अपूर्व बालपांडे यांचे वडील अमृत बालपांडे हे जलसंपदा विभागातून सहायक मुख्य अभियंता पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत. आई विजयश्री ही गृहिणी आहेत. 

नागपूरकरांना कडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos