महत्वाच्या बातम्या

 चुरचुरा शिवारात हत्तींचा धुडगूस सुरूच : धानपिकाचे नुकसान


- रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी चिंतेत; नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : चुरचुरा शिवारात रानटी हत्तींचा धुडगूस सुरूच असून, गुरुवारी रात्री हत्तींनी शेतात प्रवेश करून धानपिकाची नासधूस केली. या घटनेत शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

धान हे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असल्याने हत्तींच्या वावरामुळे शेतीच्या नुकसानीची भीती वाढली आहे. रात्रीच्या वेळी रानटी हत्ती शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मेहनतीने वाढविलेल्या धानपिकाची नासधूस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

चुरचुरा शिवारात हत्तींचा वावर कायम असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. हत्तींच्या हालचालींमुळे शेतात जाणे तसेच पिकांचे संरक्षण करणेही शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करावी आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच हत्तींच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos