महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून वर्धा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ज्या गावामध्ये शुक्रवार २६ एप्रिल २०२४ रोजी बाजार भरविण्यात येतो त्याठिकाणी आठवडी बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई मार्केट ॲण्ड  फेअर्स ॲक्ट १८६२ चे कलम ५ अन्वये जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश निर्गमित केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos