महत्वाच्या बातम्या

 स्ट्राँग रूम च्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवावे : मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था


- वर्धा येथील स्ट्रॉगरुमला भेट व पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व ई.व्ही.एम. मशिन सेवाग्राम रोड वरील एम.आय.डी.सी. येथील स्ट्रॉगरुमध्ये चोख सुरक्षेमध्ये जमा करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन स्ट्राँगरुमच्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी दिले.

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी वर्धा येथील स्ट्रॉगरुमला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. नोडल अधिकारी महेश मोकलकर, सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, संपर्क अधिकारी श्री. वाघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मतदान झाल्यानंतर स्ट्रॉगरुमची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. ०८ वर्धा लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहाही विधानसभा मतदार संघातील ई.व्ही.एम. जमा करण्यात येणार असल्याने स्ट्रॉगरुमच्या साठवण क्षमतेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या मतमोजणी हॉलची तसेच पूर्वतयारी प्लॅनची त्यांनी पाहणी केली. मतमोजणीच्यावेळी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवेश, सुरक्षा व्यवस्था, पोलींग एजंटला प्रवेश आदींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.





  Print






News - Wardha




Related Photos