महत्वाच्या बातम्या

 समता पंधरवडा निमित्य जातवैधता प्रमाणपत्राकरीता विशेष मोहिमेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये आयोजित समता पंधरवडा निमित्य सत्र २०२३-२४ करीता १२ विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणत्र पडताळणी केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी आपला रितसर, परिपूर्ण भरलेला अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी करीता सादर करावा. तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास सीईटी व्दारे २०२४-२५ मध्ये प्रवेश घेऊ इच्छीत असणाऱ्या (तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे ज्यांना अभियांत्रीकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे.) विद्यार्थ्यांनी आपला रितसर भरलेला अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी करीता सादर करावा. 

सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणत्र पडताळणी करीता अर्ज सादर केलेले आहे. परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांचे प्रकरणे त्रुटी मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्रुटी पुर्ततेकरीता कार्यालयास संपर्क साधावा व लवकरात लवकर त्रुटींची पुर्तता करून घ्यावे, असे समिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos