महत्वाच्या बातम्या

 माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत भामरागड तालुक्यातील विविध गावात कॉर्नर सभा संपन्न


- भामरागड, धोडराज, आरेवाडा, पेरिमिली लोकसभा निवडणूक प्रचारसभा.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भामरागड तालुक्याच्या दौरा केला. या दौऱ्यात ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संवाद साधले तसेच केंद्र सरकारच्या कार्याची माहिती दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे भारत नव्या उमेदीने प्रगतीकडे वाटचाल करतो आहे. मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगभर उंचावली आहे. ती आणखी उंचावण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.

यावेळी नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि यांच्यातला उत्साह पाहता अबकी बार ४०० पार ची घोषणा सत्यात उतरेल यात कुठलेही दुमत नाही.

याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos