महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात ६ लक्ष ५ हजार मतदार माहिती चिठ्ठी चे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. ११ - भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी ९ लक्ष ९६ हजार  ९२३ मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदर चिठ्ठी पोहचविण्यात येणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार माहिती चिठ्ठी चे वाटप: भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ९ लक्ष ९६ हजार ९२३ मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध झाल्या असून यापैकी ६ लक्ष ५ हजार ३१५ चिठ्ठ्या विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आले आहे. तसेच तुमसर  विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९३ हजार ४०१, भंडारा विधानसभा मतदारसंघात २ लक्ष १८ हजार ४४८, साकोली  मतदारसंघात १ लक्ष ९३ हजार, ४६६ चिठ्ठ्या देण्यात आल्या असून तुमसर विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९ हजार ७९४, भंडारा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ५१ हजार ५०५,व साकोली विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ३० हजार ३०९, मतदार माहिती चिठ्ठी वाटप करणे बाकी आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आता बी.एल.ओ. मार्फत घरोघरी मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत ३ लक्ष ९१ हजार ६०८ मतदार माहिती चिठ्ठी १६ एप्रिल, २०२४ पर्यत वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात असल्यांचे नोडल अधिकारी तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष कापगते यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos