भामरागड तालुक्यात ५५.५१ टक्के मतदान, दोन मतदान केंद्रांवर दोन टक्क्यांपेक्षाही कमी मतदान


- भटपार मतदान केंद्रावर ३.०३ टक्के मतदान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
आज २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. भामरागड तालुक्यातील २८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये तालुक्यातील ५५.५१ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. तालुक्यातील नेलगुंडा आणि गोंगवाडा या दोन मतदान केंद्रांवर दोन टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे तर एका मतदान केंद्रावर केवळ ३.०३  टक्के मतदान झाले आहे.
तालुक्यातील हिंदूर मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदान केंद्रावर १९६ पैकी १५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची टक्केवारी ७८.०६  टक्के आहे. सर्वात कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांमध्ये नेलगुंडा, गोंगवाडा आणि भटपार मतदान केंद्रांचा समावेश आहे. नेलगुंडा मतदान केंद्रावर ७०५ पैकी १४ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी १.९९  टक्के आहे. गोंगवाडा मतदान केंद्रावर ७१५ मतदारांपैकी केवळ १० मतदारांनी मतदान केले असून १.४०  टक्के मतदान झाले आहे तर भटपार मतदान केंद्रावर ५२८ पैकी केवळ १६ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ३.०३ टक्के आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-21


Related Photos