ग्रामसभा रायपूर येथील जनतेनी भाजपाच्या अशोक नेते यांना मोठ्या संख्येने मतदान करावे
- आमदार डॉ. देवराव होळी यांनी घेतली ग्रामसभेच्या कार्यकर्त्यांची बैठक
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : रायपुर येथील जनतेने येणाऱ्या १९ एप्रिल च्या मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना मोठ्या मताधिक्याने मतदान करून विजयी करावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी या बैठकीच्या प्रसंगी केले.
या बैठकीला रायपूर ग्रामसभेचे राजू मडावी, सुभाष वेडधा, पंडित नरोटे, अरविंद उईके, दिनेश तूमरेठी, धनराज खोब्रागडे जप्पी ग्रामसभेचे मधुकर हिचामी, संजय हिचामी, सरंडा ग्रामसभेचे यशवंत पदा, राजेश हीचामी चिचोडा ग्रामसभेचे येशू गावळे, रायपूरचे आशिष माडावी राजू वडदा रमेश वासेकर केसरी मडावी यांचे सह ग्रामसभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli