महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात होणार ९ लक्ष ९६ हजार मतदार माहिती चिठ्ठी चे वाटप


- प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. ११ - भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून मतदार माहिती चिठ्ठी चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी ९ लक्ष ९६ हजार मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदर चिठ्ठी पोहचविण्यात येणार आहे.

याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी नुकताच आढावा घेऊन सुचना दिल्या. कुंभेजकर  म्हणाले, बी. एल. ओ. मार्फत मतदार माहिती चिठ्ठी लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. ज्या क्षेत्रात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते. त्यामुळे मतदार माहिती चिठ्ठी चे नियमित वाटप करा. अधिका-यांनीसुध्दा क्रॉस चेकिंग करून मतदारांपर्यंत माहिती चिठ्ठी पोहोचले की नाही, याची पडताळणी करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार माहिती चिठ्ठी चे वाटप : भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ९ लक्ष ९६ हजार मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध झाल्या असून यापैकी २ लक्ष ४१  हजार चिठ्ठ्या विधानसभा मतदारसंघात पोहचविण्यात आल्या आहेत. यात तुमसर  विधानसभा मतदारसंघात ७८ हजार, भंडारा  विधानसभा मतदारसंघात ५६ हजार, साकोली मतदारसंघात १ लक्ष ०६ हजार, चिठ्ठ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आता बी.एल.ओ. मार्फत घरोघरी मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत ७ लक्ष ५५ हजार मतदार माहिती चिठ्ठी १६ एप्रिल तारखेपर्यंत वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात  आल्याचे नोडल अधिकारी तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष कापगते यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos