महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार संघातील १० मतदान केंद्रांचे महिला करणार संचालन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : 08 वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात 10 महिला मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांचे सर्व संचालन हे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी हिंगणघाट व वर्धा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्वच विधानसभा मतदारसंघात महिला मतदान केंद्र असणार आहेत.

मतदान केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी असा निवडणुकीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग हा महिला असणार आहे. धामणगाव विधानसभा मतदार संघातील चांदूर रेल्वे येथील मतदान केंद्र क्र. 85 जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, उत्तर दिशा खोली क्र. 11, मोर्शी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 111 शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, पश्चिमेकडील इमारत खोली क्र. 7, आर्वी विधानसभा मतदार संघातील मतदान कारंजा येथील केंद्र क्र. 92 कस्तुरबा विद्यालय, दक्षिण दिशा खोली क्र. 2 आणि आर्वी येथील मतदान केंद्र क्र. 161, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. 4, देवळी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 181 व 182 नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय, देवळी खोली क्र. 1 व 2, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 254 भैयाजी सालवे प्राथमिक स्कूल व मतदान केंद्र क्र. 263 सेंट जॉन्स हायस्कूल, हिंगणघाट, वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 253 शासकीय विद्यालय, वर्धा खोली क्र. 1 आणि भिमनगर, सावंगी येथील मतदान केंद्र क्र. 309 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. 4 या केंद्रांचा समावेश आहे.

ज्या मतदान केंद्रात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त असते, अशा ठिकाणी साधारणत: महिला मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजावावा, हाच या केंद्रांच्या निर्मितीमागील उद्देश आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos