महत्वाच्या बातम्या

 वर्धा शहरातील विविध भागात मतदार जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी स्वीपच्या माध्यमातून वर्धा शहरातील सुभाष चौक, बिरसा मुंडा चौक, नामदेव मठ, सराफा लाईन, बस स्टॅण्ड यासारख्या विविध भागात पथनाट्य, मतदान जनजागृती गीत, दिव्यांग मतदार जनजागृती गीत, शपथ अशा विविध माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

महिला आश्रम परिसरात विशेष मतदार जनजागृती मोहीम -

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन महिला आश्रम परिसरात करण्यात आले होते. लोकशाहीत आपल्या मताचे मूल्य व मतदानाची टक्केवारी वाढावी हा उद्देश या प्रतिकृतीचा होता. यावेळी वोट ची प्रतिकृती विद्यार्थ्यानी तयार केली व मतदार जनजागृतीसाठी वर्ग ८ ते ११ वी च्या विद्यार्थ्यांची रॅली काढली.

मतदार जनजागृतीसाठी चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केली. सुशील हिम्मतसिंगका जू कॉलेजच्या प्राचार्या तायडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विशेष मतदार जनजागृती कार्यक्रमात, लोकशाहीला सशक्त करा तुमचा मतदानाचा अधिकार वापरा आणि २६ एप्रिल २०२४ ला होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग मतदारांकरीता व ८५ वर्षावरील पात्र मतदारांसाठी कोणत्या सूविधा बहाल केलेल्या आहेत. याबद्दल बीएलओ संजय सुकलकर, उमेश गौतम, नारायण शिवणकर यांनी यावेळी माहिती दिली.





  Print






News - Wardha




Related Photos