महत्वाच्या बातम्या

 वेळ काढून अवश्य मतदान करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे कामगार व उद्योग जगताला आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागापासून ते महानगरापर्यंत, शेतकऱ्यांपासून जंगलातील आदिवासी बांधवापर्यंत ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत असलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपले मतदान करावे. यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मिहानमधील कार्यरत असलेल्या विविध औद्योगिक कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत आज त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून अधिकाधिक कामगार मतदान कसे करतील यादृष्टीने भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

मिहान येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध कार्पोरेट कंपन्यामध्ये वरिष्ठ अधिकारी, मिहानमधील रहिवासी / अर्पाटमेंटचे रहिवासी आदि उपस्थित होते. मिहान औद्योगिक क्षेत्रात सुमारे ३८ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे. विविध कंपन्यामुळे तेथील कामगारांनी जवळच राहण्यास पसंती दिलेली आहे. कामगारांनी कंपनीच्या कामात व्यस्त राहण्यासमवेत मतदानासाठी आवर्जून वेळ काढावा व व्यवस्थापनानेही त्यांचे मतदान होईल. याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos