आलापल्ली - सिरोंचा मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आलापल्ली - सिरोंचा मार्गावर गोल्लाकर्जी गावापासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज १६ ऑक्टोबर  रोजी घडली आहे.
या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव अद्याप कळू शकले नाही. एमएच ३३ जे ८३१५ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने चिरडले. या अपघातात मृतकाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. घटनेचा तपास राजाराम पोलिस करीत आहेत. 

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-16


Related Photos