महत्वाच्या बातम्या

 निवडणूक खर्चाची लेखे तपासणी ४, १२ व १६ एप्रिल रोजी   


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून २०२४ ची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक खर्चाचे लेख तपासणी करून घ्यावयाचे आहे. याकरीता दिलेल्या तारीख व वेळेत संबंधित उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आले आहे.   

१३- चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया हे गुरुवार ४ एप्रिल, शुक्रवार १२ एप्रिल व मंगळवार १६ एप्रिल २०२४ रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सदर तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या वेळेतच उमेदवारांना आपले निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करावयाचे आहेत.

जे उमेदवार निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील बाब क्र.७७ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र ठरतील. निवडणूक आयोगामार्फत अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos