महत्वाच्या बातम्या

 रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाने रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. मनिष व्दिवेदी हे काटोल, सावनेर व हिंगणा या विधानसभा मतदारसंघाचे व अनुनय भाटी हे उमरेड, कामठी व रामटेक या विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक असतील.

मनिष व्दिवेदी यांचा मोबाईल क्रमांक 8263897469 असा आहे. अनुनय भाटी यांचा मोबाईल क्रमांक 9579522120 असा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च निरीक्षणासाठी आलेले निवडणूक खर्च निरीक्षक अनुनय भाटी व मनिष व्दिवेदी यांची निवासाची व्यवस्था रवि भवन येथील अनुक्रमे कॉटेज क्रमांक 7 व  8 येथे करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे खर्च लेखा तपासणी 5, 10 व 16 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात येणार आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवाराची, नागरिकाची किंवा मतदारांची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी  तुषार ठोंबरे यांनी कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos