महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२८ मार्च महत्वाच्या घटना

१७३६ : बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

१८५४ : क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

१९१० : हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

१९३० : तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.

१९४२ : रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.

१९७९ : अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

१९९२ : उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९८ : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

१९८८ : ६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले

२८ मार्च जन्म

१८६८ : रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६)

१९२५ : अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)

१९२७ : भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०१३)

१९६८ : इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्म.

२८ मार्च मृत्यू

१९४१ : ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२)

१९६९ : अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)

१९९२ : स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन.

२००० : शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos