महत्वाच्या बातम्या

 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रास भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी देवळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणास भेट दिली व मार्गदर्शन केले.

यावेळी ४५- देवळी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियांका पवार, तहसीलदार दत्तात्रय जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण एक महत्वाचा घटक आहात याचा अभिमान बाळगावा. लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये संपूर्ण देशात २ कोटीपेक्षा जास्त लोक एकावेळी काम करत असतात. सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी लक्षपूर्वक प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण करावेत. तसेच मुक्त आणि निपक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांनी सकारात्मकपणे प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.





  Print






News - Wardha




Related Photos