महत्वाच्या बातम्या

 ओटीपी फसवणूक टळणार : येणार बायोमेट्रिक प्रणाली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : ओटीपी आणि पासवर्ड हॅकिंगच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मंडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) संशोधकांनी नवी क्रांतिकारी प्रणाली विकसित केली आहे.

ही प्रणाली सुरक्षित प्रमाणीकरणासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी बायोमेट्रिक-आधारित वर्तन शैलीचा आधार घेईल.

अडॅपआयडी नावाची ही प्रणाली आयआयटी मंडीने डीप एल्गोरिदम च्या सहकार्याने विकसित केली आहे. या प्रणालीची संकल्पना आयआयटी मंडी व आयआयटी कानपूरची असून ती विकसित करण्यात डीप एल्गोरिदम ने पुढाकार घेतला आहे. या प्रणालीला आधीच पेटेंट मिळाले असून, सध्या एक बँक व न्यायवैद्यक कंपनी या प्रणालीचा वापर करत आहे. सरकारी योजनांच्या प्रमाणीकरणासाठी या प्रणालीचा वापर करण्यात यावा यासाठी आयआयटी मंडीची केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे.





  Print






News - World




Related Photos