महत्वाच्या बातम्या

 वर्धा विधानसभा मतदारसंघा करीता नियंत्रण कक्षाची स्थापना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेच्या निवडणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वर्धा विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूकीकरीता नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.

वर्धा विधानसभा मतदार संघातील नागरिकांना निवडणूकी संबंधी तक्रार किंवा माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षाच्या 07152-254070, 07152254071 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos