महत्वाच्या बातम्या

 आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासुन वर्धा लोकसभा मतदार संघात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचार संहितेचे वर्धा विधानसभा मतदार संघातील नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोपणे पालन करावे, अशा सूचना वर्धा लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी दिल्या.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहितेचे पालन करण्यासाठी माहिती देण्यासाठी वर्धा विधानसभा मतदार संघातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी सामाजिक न्यायभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आचार संहिता दरम्यान काय करावे काय करु नये याबाबत सूचना देऊन आपल्या क्षेत्रातील पोस्टर बॅनर काढावे, किंवा झाकुन टाकावे, अशा सूचना दिल्या.

बैठकीला  मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांची उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos