महत्वाच्या बातम्या

 जंगलात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या दोन इसमास वनविभागाने आवळल्या मुसक्या


- कारवा जंगलात लाईव्ह कॅमेऱ्याने टिपले संशयितांना; वन कायद्यानुसार दोघांना केली अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील कारवा वनपरिक्षेत्रात  सध्या बिब्बट व वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. कारवा जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या इसमाचा नरभक्षी वाघाने बळी घेतला तर बिबट्याने बल्लारपूर शहरात घुसून एका चिमुकलीवर हल्ला चढवत गंभीर जखमी केले. तसेच वाघाने आता पर्यंत तिघांचा बळी घेतले आहे. यामुळे बल्लारशाह वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम उघडली असता रविवार १७ मार्चला दोन इसम दुपारी ३.३० वाजता कारवा राखीव वनखंड क्र. ४९३ जंगलामध्ये संशयास्पद स्थिती लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये दिसले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ ज्वलनशील साहित्य आढळून आले यावरून जंगलात आग लावण्याचा हेतू व वाघ जेरबंद करण्याच्या मोहिमेत अडथळा आणल्याच्या कारणावरून दोघांना वनकायद्यानुसार अटक करण्यात आली.

बल्लारपूर शहराला लागून असलेल्या कारवा नियतक्षेत्रातील जंगलात दोन इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे लाईव्ह कॅमेऱ्यात दिसून आले. त्यांना कारवा सफारी गेटजवळ थांबवून झडती घेतली असता त्यांच्या जवळ ज्वलनशील साहित्य आढळून आले. यामुळे जंगलात आग लावण्याचा हेतू व वाघ जेरबंद मोहिमेत अडथळा करण्याच्या कारणावरून आरोपी  चंदन वासुदेव तिलोकानी (३६) वर्ष रा. महात्मा गांधी वार्ड बल्लारपूर व सारंग शैलेश राहुलगडे (२३) रा. साईबाबा वार्ड , बल्लारपूर यांच्या विरुद्ध भारतीय वनअधिनियम  १९२७ कलम २६ (१)  ब, ड नुसार गुन्हा नोंदवून त्यांच्या जवळ असलेले ज्वलनशील साहित्य, मोबाईल व दुचाकी जप्त करून कारवाई करण्यात आली.

सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वन विभाग चंद्रपूरचे उपवनसंरक्षक स्वेता बोड्डू  व सहा. वनसंरक्षक आदेशकुमार  शेडगे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह नरेश भोवरे हे करीत असून क्षेत्र सहाय्यक ए. एस. पठाण, व्ही. पी. रामटेके, बी. टी. पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आनकाडे, रंजीत दुर्योधन, वैशाली जेनेकर, माया पवार, सुनील नन्नावरे, मनोहर धाईत, धर्मेंद्र मेश्राम व एस.आर. देशमुख आदींचे सहकार्य लाभले.





  Print






News - Chandrapur




Related Photos