महत्वाच्या बातम्या

 बालकांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शासकीय डागा स्मृती रुग्णालय येथे राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिना निमित्य डी.इ.आय.सी. येथे जन्मदोष असणाऱ्या बालकांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याचबरोबर आर.बी.एस.के. पथक रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना जन्मदोष ओळख निदान व व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचारकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नवघरे, डॉ. माधूरी थोरात, बालरोग तज्ञ डॉ. विनिता जैन व इतर सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

डी.ई.आय.सी. व्यवस्थापक डॉ. विवेक येवले यांनी शिबिराची व प्रशिक्षणाची प्रस्तावना मांडली. मान्यवरांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विनिता जैन यांनी संदर्भित बालकांची डी.इ.आय.सी. तपासणी केली व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. डी.इ.आय.सी. चे भोयर यांनी उपस्थितांचे आभार मानले.





  Print






News - Nagpur




Related Photos