महत्वाच्या बातम्या

 १५ ते १६ मार्च रोजी नागपूर ग्रंथोत्सव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १६ मार्च या कालावधीत वसंतराव नाईक शासकीय कला व  समाज विज्ञान संस्था, संविधान चौक येथे सकाळी ११ वाजता गंथ्रोत्सवाचे उद्घाटन समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वि.स. जोग यांच्याहस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोहर कुंभारे यांची उपस्थिती राहील.

१५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने याची सुरुवात होईल. सेवासदन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. समय रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, प्र.ग्रंथपाल वर्ग -१ मिनाक्षी कांबळे, प्र. सहाय्यक ग्रंथालय संचालक रत्नाकर नलावडे, योगेश पिंपळे यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रंथदिडी सेवा सदन संस्था प्रांगण येथून मार्गस्थ होऊन झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल, संविधान चौक मार्गे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था येथे समारोप होईल.

१५ मार्च रोजी उद्घाटन समारंभानंतर दुपारी २ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात साहित्य अभिवाचन होईल. यात प्रा. रंजना पाठक, विवेक खेर, मंगेश बावसे यांचा समावेश आहे तर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता  देहदान व अवयवदान : काळाजी गरज या विषयावर होईल. यात सुशिल मेश्राम, विना वाठोरे, शालीनी पाटील यांचा समावेश आहे. तिसऱ्या सत्रात दुपारी ४.३० वाजता एकपात्री प्रयोग सादर करण्यात येईल.

१६ मार्चला सकाळी ११ वाजता कवीसंमेलन विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात माधव शोभणे, मंगेश बावसे, प्रकाश पनवेलकर, संजय गोडघाटे, आनंद देशपांडे, मनोज वैद्य, धनश्री धारकर, मिनल येवले व जयश्री अंबासकर यांचा समावेश आहे. दुपारी २ वाजता ग्रंथानी मला घडविले या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल मस्के, वरिष्ठ उप महालेखापाल अक्षय खंडारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, वनामतीचे उपसंचालक निलेश ठोंबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, उपजिल्हाधिकारी माधुरी तिखे, सहाय्यक पोलीस आयुक्त  माधुरी बाविस्कर यांचा समावेश आहे. दुपारी ४ वाजता किशोर व किशोरींना मराठी वाचनाची गोडी लागावी याकरिता : ग्रंथालयाची भूमिका या विषयावर चर्चा सत्र होणार आहे.

ग्रंथात्सवाच्या समारोपीय कार्यक्रमास लेखा व कोषागार विभागाच्या सह संचालक ज्योती भोंडे, धर्मदाय उपायुक्त  किशोर मसने, ग्रंथपाल सुनिल पुनवटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड व सुचना विज्ञान अधिकारी सी.एस. ढवळे यांची उपस्थिती राहणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos