महत्वाच्या बातम्या

 पीएम- सुरज योजनेचा १३ मार्च रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ


- वन अकादमी येथे दूरदृष्यप्रणाली द्वारे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : देशाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) व सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरीता शिक्षणाच्या प्रभावी सुविधा, शिष्यवृत्ती तसेच सिमांत वर्गाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण व अल्प व्याजदरात कर्जाद्वारे आर्थिक सहाय्यता आदी प्रयोजनार्थ राष्ट्रव्यापी स्तरावर राबविण्यात येत असलेल्या पीएम-सुरज (प्रधानमंत्री-सामाजिक उत्थान व रोजगार आधारीत जनकल्याण) या महत्वाकांक्षी योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा शुभारंभ १३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. वन अकादमी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील ५२५ जिल्ह्यात ही सामाजिक सशक्तीकरण योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा या योजनेत प्रारंभिक स्तरावर समावेश करण्यात आहे. या जिल्ह्यांसाठी प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रीय कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुंबईकरीता केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नागपूरकरीता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सिंधुदूर्ग येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे, नाशिककरीता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, धुळे येथे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, सोलापूर येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अहमदनगर करीता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हिंगोली येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा समावेश आहे.

वन अकादमी येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित राहतील.





  Print






News - Chandrapur




Related Photos