अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कारावास


- चंद्रपूर येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर
: अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला घरात बोलावून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधिश स.ज. अंसारी यांनी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सुरेश शालकराव पवार (१९) रा. भोयेगाव ता. कोरपना असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २५ एप्रिल २०१७ रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही आपल्या घराबाहेर खेळत होती. यावेळी आरोपी सुरेश पवार याने तिला घरात बोलाविले. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी गडचांदूर पोलिस ठाण्यात कलम ३७६ (२) (आय) (जे)  भादंवी सहकलम ४, ५ (एम) , ६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास करून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद रोकडे यांनी आरोपीस अटक केली. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे काल ३० सप्टेंबर रोजी शिक्षा ठोठावली. 
आरोपीस पोक्सो अंतर्गत १० वर्ष शिक्षा व२  हजार रूपये दंड , दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. डी.व्ही. महाजन  आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार विलास वासाडे यांनी काम पाहिले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-01


Related Photos