महत्वाच्या बातम्या

 रमाई आवास योजना शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


- १ हजार ५७३ प्रस्तावांना मंजूरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महापालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) अंतर्गत दोन दिवसीय शिबिराचे आयोजन नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले. या शिबीरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरात रमाई घरकुल आवास योजनेचे एकूण ३ हजार ३४१ प्रस्ताव तपासणीसाठी झोनद्वारे सादर करण्यात आले. त्यापैकी १ हजार ५७३ प्रस्ताव तपासणीअंती पात्र करण्यात आले. उर्वरीत १ हजार ७६८ प्रस्ताव आक्षेपावर पूर्तता करण्यासाठी संबंधित झोनला परत करण्यात आले. या शिबिरात रमाई घरकुल आवास योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

रमाई घरकुल आवास योजनेची प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे, महानगरपालिका व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी यापूर्वी अर्ज केला आहे, परंतु त्यांना काही कारणास्तव या योजनेचा लाभ मिळालेला नाही, तसेच ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा लाभार्थ्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.





  Print






News - Nagpur




Related Photos