महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


५ मार्च महत्वाच्या घटना

१५५८ : फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

१६६६ : छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

१८५१ : जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

१९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.

१९३३ : भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

१९६६ : म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.

१९९७ : संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

१९९७ : धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

१९९८ : रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.

२००० : कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

२००७ : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना

५ मार्च जन्म

१५१२ : नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)

१८९८ : चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)

१९०८ : ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)

१९१० : संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.

१९१३ : किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)

१९१६ : ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)

१९७४ : अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.

५ मार्च मृत्यू

१८२७ : इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५)

१९१४ : नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.

१९५३ : सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८७८)

१९६६ : साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.

१९६८ : समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.

१९८५ : महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.

१९८५ : कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.

१९८९ : गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.

१९९५ : हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.

२०१३ : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९५४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos