उद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या


-  मूर्तीच्या किमतीत २० टक्के वाढ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणेशोत्सवासाठी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लगबग सुरू झाली आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठाही गजबजल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्यासह गणपती मूर्तींच्या किंमतीमध्येही २० टक्के वाढ झाली असल्याचे दिसून येत  आहे.  
मूर्तीची विक्री करणारे अनेक स्टॉल्स लागले असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ही विक्रीसाठी दिसत आहेत.  शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ  झाली असल्याने यंदा किमान ५०० ते ६०० रुपयांनी मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. 
थर्माकोल आणि प्लास्टिकचा उपयोग करू नका, असे आवाहन विविध पर्यावरणवादी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केले जात असले तरी बाजारात मात्र त्याची विक्री सुरूच आहे. गणपतीच्या मागे करण्यात  येणारी आरास   हजारो रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहे. इतर वेळी ५० ते २०० रुपयाला मिळणाऱ्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या फुलाच्या माळा, तोरणे आता ३०० ते ५०० रुपयाला विकली जात आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-12


Related Photos