जनजागृतीमधून लोकशाही सुदृढ होण्यास मदत होईल : डॉ.मोहीत गर्ग


- स्वीप समितीच्या बैठकीत विभाग प्रमुखांना सुचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
  जिल्ह्यातील मतदारांना निवडणुक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. यातूनच आपली लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होईल असे आवाहन अतिरीक्त  पोलीस अधीक्षक तथा स्वीप समितीचे सदस्य सचिव डॉ.मोहित गर्ग यांनी केले. जिल्हयात मतदार जनजागृतीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वीप समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेणेत आली त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या कृती आराखड्यावर चर्चा झाली. यावेळी मे म्हणाले की जास्तीत जास्त लोकांना मतदान प्रक्रिया व मतदान करण्याचे फायदे सांगावे लागतील. प्रत्येक विभाग व शाळा महाविद्यालयाचे योगदान या जनजागृती कार्यक्रमात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक उपस्थित सदस्यांच्याकडून विविध नियोजन व संकल्पना घेतल्या. विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक प्रचार प्रसार साहित्य जिल्हा स्तरासवरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या अभियानात माध्यमांचे महत्वाचे स्थान आहे. पारदर्शक निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी माध्यमांनी मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगणे गरजेचे आहे. जिल्हयातील विविध मतदार जनजागृती कार्यक्रमांना माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी असे ते यावेळी म्हणाले. सामाजिक माध्यमांचा वापर प्रशासनाकडून व जिल्हा माहिती कार्यालयाकडून केला जात आहे. त्याचा वापर मतदार जनजागृतीसाठी केला जाणार आहे.
 या बैठकित मतदार जनजागृतीबाबत बॅनर्स, पोस्टर्स, संकल्पपत्र, कलापथक कार्यक्रम, एसएमएस, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम, प्रभात फेरी, रक्तदान शिबीर, गृहभेटी असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. स्वीप समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणुक अधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत लेखी सुचना या अगोदर दिल्या आहेत. सर्व जिल्हयातील प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम व प्रक्रियेबाबत मतदारांना माहिती देण्यासाठी आवश्यक सुचना दिलेल्या आहेत. 
या बैठकीला उप जिल्हा निवडणुक अधिकारी कल्पना निळ- ठुबे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रूढे,  उप प्रदेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस एच पेंदाम,  प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक पी एम भोसले, डीडीएम नाबार्ड आर जी चौधरी, शिक्षणाधिकारी माध्य. आर पी निकम, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिन अडसुळ, महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडंगे, सहा.स्वीप नोडल अधिकारी सागर पाटील, सदस्य कृष्णा रेड्डी व इतर अधिकारी उपस्थित होते. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-26


Related Photos