विहिरीत आढळले आईसह चार मुलींचे मृतदेह , बुलडाणा जिल्ह्यात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलडाणा :
  मेहकर तालुक्यातील माळेगावात  एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने जिल्ह्यात  खळबळ निर्माण झाली आहे.   मृतांमध्ये आईसह ४ मुलींचा समावेश आहे. आई उज्वला ढोके (३५), मुलगी वैष्णवी ढोके (९), दुर्गा ढोके (७), आरुषी ढोके (४) आणि पल्लवी ढोके या १ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. आता हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, आईसह ४ मुलींची हत्या करण्यात आली की ही आत्महत्या आहे,  याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. या प्रकणाचा पोलीस शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होऊ शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणात ढोके कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांची चौकशी करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-09-23


Related Photos