दारू पिण्याकरिता घरच्यांनी पैसे न दिल्याने युवकाने घेतला गळफास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
दारू पिण्यासाठी घरच्यांनी पैसे नाकारल्यामुळे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील किल्ला वॉर्ड येथे घडली आहे. 
  रवी महाकाली गडपवार (३०) याने  स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . मृतक रवी याला दारूचे व्यसन होते.  दिवसभर काम करून मिळालेले पैसे   तो दारूमध्ये उडवीत होता.  आणखी दारू पिण्या करिता घरच्यांना  पैसे मागत होता.  पैसे नाही दिले तर तो आपल्या  परिवारा सोबत भांडण करीत होता.  परिवाराच्या म्हन्यानुसार आज २१ सप्टेंबर रोजी  रवी कामावरून जेवण करण्या करिता घरी आला आणि दारू पिण्या करिता आपल्या वृद्ध आईला पैसे मागितले.    वृद्ध आई जवळ पैसे नसल्याने पैसे दिले नाही. या कारणाने आईला मारण्याची धमकी देऊ लागला आणि आईला घरा बाहेर काढले.   दार बंद करून दुपट्ट्याने घराच्या  छताला  गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.  बल्लारपूर पोलिस  पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-21


Related Photos