माविमकडून वस्तू व सेवा स्वरूपात भामरागड पूरग्रस्तांना मदत


- जेवण तयार करणे, जीवनावश्यक वस्तू व ब्लँकेटसह कापडी पिशव्यांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली   :
महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली द्वारा जिल्हयातील लोक संचालित साधन केन्द्रांनी भामरागड पुरग्रस्तांसाठी विविध वस्तू स्वरूपात व प्रत्यक्ष भामरागडमध्ये जेवण तयार करणे अशा दुहेरी स्वरूपात मदत केली आहे. 
आज माविम कार्यालय गडचिरोली येथून पूरग्रस्तांना मदत म्हणून गाडी भरून अन्नधान्य, तेल व कापडी पिशव्या पाठविण्यात आल्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ व वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी वाहनाला हिरवी झेंडी दाखविली. या मदतीमध्ये 25 कुटुंबांना दैनंदिन आवश्यक 17 वस्तूंचे किट, अतिरीक्त 10 कुटुंबांना पुरेल एवढा किराणा, 5 क्विंटल तांदुळ, ब्लँकेट, बेडशीट व 1000 साहित्य वाटपासाठी कापडी पिशव्या यांचा समावेश आहे. यावेळी माविम मधील कर्मचारीवृंद उपस्थित होते.     
माविम गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागड येथील त्रिवेणी महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट व मूमताज महिला बचत गट पुढे येऊन पूरग्रस्तांना  ११ सप्टेंबर पासून अन्नदान करत आहेत. यासाठी भामरागडमधील गावकऱ्यांचीही साथ वेळोवेळी लाभत आहे. CMRC कडून व्यवस्थापक अंजली दोन्तूल,  उपजिविका समन्वयक  रूख्मिनी भलावी , सहयोगीनी  देविका पूंगाटी  नियोजनात वेळोवेळी सहयोग करत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-16


Related Photos