महत्वाच्या बातम्या

 १३ नमुना ब वर कोणत्याही आक्षेप किंवा सूचना असल्यास १६ फेब्रुवारी पर्यत तहसिल कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ग्रामपंचायत जामगाव-वळद पु. व मौदी पु. येथील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, भंडारा तालुक्यातील माहे जानेवारी 2024 ते डिसेबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जामगाव-वळद पु. व मौदी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 फेब्रुवारी 2024 पर्यत प्रारुप आरक्षणावर कार्यवाही करुन 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा मसुदा परिशिष्ट 13, नमुना-ब संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसिल व पंचायत समिती कार्यालय भंडारा येथील सूचना फलकावर सर्व नागरीकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्दी करण्यात आली आहे.

त्याकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या परिशिष्ट 13, नमुना व वर कोणत्याही नागरीकांच्या आक्षेप किंवा सूचना असल्यास ते आक्षेप किंवा सूचना 16 फेब्रुवारी 2024 नंतर सादर केलेल्या आक्षेप व सूचनांचा विचार केला जाणार नाही. यांची संबंधिताना नोंद घ्यावी,असे आवाहन तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी ग्रापनि, विनीता लांजेवार यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos