महत्वाच्या बातम्या

 २० फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : समस्याग्रस्त व पिडीत महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलबध व्हावी, यासाठी दर माहिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. फेब्रुवारी महिन्याच्या तिस-या सोमवारला शासकीय सुट्टी असल्यामुळे मंगळवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महिला लोकशाही दिनामध्ये पिडीत महिलांच्या तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. महिलांनी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसणारे अर्ज, न्यायप्रविष्ठ, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही, असे जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos