देसाईगंज येथे धावत्या वाहनातून पडला विद्यार्थी ; अनर्थ टळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
 आ. कृष्ण गजबे राहत असलेल्या निवासस्थानासमोरील  जीवघेणा खड्ड्यात धावत्या वाहनातून   एक विद्यार्थी पडला. मात्र  सुदैवाने मागुन कोणतीच गाडी येत नसल्याने मोठा अनर्थ टळला.  
प्राप्त माहितीनुसार  आज शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने    दुचाकी,  चार-चाकी  वाहनांची गर्दी होती.  रस्ता खराब असतांनाही वाहने अतिशय वेगाने दामटली जातात.  यामुळे  आज दु. १.३०  वाजताच्या सुमारास बाज़ार समिती मार्गे एक विद्यार्थी  भरलेले वाहन मच्छी मार्केट मार्गावर वळून पुढे जात असतांना  वाहनाचा दरवाजा आपोआप उघडला गेला. यामुळे धावत्या वाहनातून  एक विद्यार्थी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला . विद्यार्थी पडताच वाहन    पुढे जाऊन वेग कमी करून थांबविण्यात आले.  विद्यार्थी  पडताच पत्रकार दुबे यांनी धाव जाऊन विद्यार्थ्याला उचलून आपल्या कार्यालयात बसविले.  सदर वाहनात १५ ते २० विद्यार्थ्यांसह काही शिक्षिका सुद्धा  होत्या. वाहनाचा दरवाजा बरोबर नसल्यामुळे आणि खड्डा  आल्याने आपोआप दार उघडून विद्यार्थी पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.  सादर वाहन  गुरुकुल संस्कार विदर्भ इंटरनॅशनल स्कूल तूकूम वार्ड देसाईगंज (वडसा) येथील असल्याचे उपस्थित शिक्षिकांनी सांगितले. विद्यार्थी पडला त्यावेळी मागुन कोणतेही वाहन येत नव्हते अन्यता मोठा अनर्थ घडला असता.    यामुळे  स्थानिक पोलिसांनी सर्व शाळेतील विद्यार्थी ने आन करणाऱ्या वाहनांची  कसून तपासणी करावी  अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-13


Related Photos