महत्वाच्या बातम्या

 शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली येथे धरती आबा महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे 15 नोव्हेंबर 2022 रोजी धरती आबा महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली 

सर्व प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापीका कु. डी. एच. जुमणाके हे होत्या. त्यांनी बिरसा मुंडा यांचे कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे व त्याप्रमाणे आचरण करावे असे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक प्रविन कारेकर (माध्य.शिक्षक), एस. पी. पाटील (माध्य. शि.), भुषण खोब्रागडे (सं.शि.), कु. टेकाम, सेलोटे, साईनाथ सिडाम तथा सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गुलाब डोंगरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास मडावी यांनी केले, कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. अशाप्रकारे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली येथे धरती आबा महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos