महत्वाच्या बातम्या

 ब्रम्हपुरी मतदार संघातील विकास कामे तातडीने सुरू करा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


- अधिकाऱ्यांना निर्देश - जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपुरी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमार्फत  विकास निधी प्राप्त झाला असताना केवळ प्रशासकीय मान्यता व तांत्रिक बाबी आदींची कारणे पुढे केल्याने विकासकामे ठप्प पडली आहे.यामुळे क्षेत्र विकासाला खीळ बसली असून कुठलीही दिरंगाई न करता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामे तातडीने सुरू करा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आयोजित आढावा बैठकीस चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, तथा प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर विकास कामे, तसेच प्रस्तावित विकास कामे, जन सुविधा योजना, प्रमुख मार्ग व अंतर्गत मार्ग दुरुस्ती, मृदू व जलसंधारण विभागाचे जलयुक्त शिवार अंतर्गत शेती हंगामापूर्वी करावयाची कामे, घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामा करिता वाळू उपलब्ध करून देणे, पर्यटन विकास क्षेत्र योजने अंतर्गत करावयाची कामे, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात निर्लेखित करण्यात आलेल्या १६ ग्रामपंचायत भवन नव्याने बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याबाबत, तसेच वैनगंगा नदी तीरावर अंत्यविधी करिता पायऱ्या बांधकाम करणे सोबतच प्रशासकीय इमारती बांधकाम पशुवैद्यकीय दवाखाने तथा कर्मचारी निवासस्थाने बांधकाम व इतर जनकल्याणकारी योजना अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन करावयाची विकास कामे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

याप्रसंगी बोलताना राज्याची विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, केवळ प्रशासकीय मान्यता व तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून विकास कामांना खेळणे बसविता जनसामान्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तातडीने विकास कामांना सुरुवात करा. आगामी महिन्यांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजणार असून आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर पावसाळा व पुन्हा निवडणुका असेही वर्ष संपूर्ण निवडणुकीत जाणार असून विकासाला चाप बसू नये याची काळजी घेणे प्रत्येक विभागाला गरजेचे आहे. म्हणून कामात दिरंगाई न करता प्रलंबित प्रस्तावित व मंजूर विकास कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन विकास कामे जलद गतीने सुरू करा असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.





  Print






News - Chandrapur




Related Photos