टिपागडी नदीला आलेल्या पुरामुळे मालेवाडा येथील वनवसाहत व मरेगाव वॉर्ड पाण्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
तालुक्यातील  मालेवाडा येथील टिपागडी नदीला आलेल्या पुरामुळे मालेवाडा येथील वनवसाहत व मरेगाव वार्डात  पाण्याचा शिरकाव झाल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.  येथील अनेक घरांची पडझड झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे. 
पुराचे पाणी अद्यापही गावात आहे.  टिपागडी नदीच्या  पूलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने मालेवाडा वरून धानोरा व मूरूमगाव ही वाहतूक आज सकाळ पासून बंद आहे.  घटनास्थळाला कूरखेडा चे तहसीलदार रवींद्र चव्हाण,  मालेवाडा पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी यानी भेट देत खबरदारीचा उपाय म्हणून मरेगाव वार्डातील नागरीकाना सूरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सूरू केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-07


Related Photos