छल्लेवाडा - कमलापूर मार्गावरील पुल खचला, रहदारी बंद


- आलापल्ली - सिरोंचा मार्गावरही वाहतूक ठप्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील छल्लेवाडा - कमलापूर मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचला आहे. यामुळे या मार्गावरील रहदारी ठप्प पडली आहे.
पुल खचल्यामुळे कमलापूर, छल्लेवाडा, रेपनपल्ली आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी उपविभागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील मोसम गावाजवळील नाल्याला पूर आला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. मार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे पुरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos