महत्वाच्या बातम्या

 राज्यात ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्य जिल्हयात महानाटयाचे व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन


- २ जून, २०२३ ते ६ जून, २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन
- २५, २६ व २७ जानेवारी, २०२४ या कालावधीत जाणता राजा हया नाटकांचा प्रयोग
- सतत ५ दिवस सांस्कृतिक महोत्सव होणार आहे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वने मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्य जिल्हयात महानाटयाचे व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करुन २ जून, २०२३ ते ६ जून, २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना मिळावी याउद्येशाने महानाटयांचे सादरीकरण व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत उपक्रम सुरु केला आहे.

गडचिराली येथे २५, २६ व २७ जानेवारी, २०२४ या कालावधीत जाणता राजा हया नाटकांचा प्रयोग व फेब्रुवारी, २०२४ मध्ये सतत ५ दिवस सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos